साईमत जळगाव प्रतिनिधी
राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढल्याने याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी आकाशवाणी चौक परिसरात निषेध आंदोलन केले. यावेळी कंत्राटी सरकार हाय -हाय, रोजगार द्या, नाहीतर खुच्र्या खाली करा, रद्द करा -रद्द करा, कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा आदी घोषणा देण्यात आल्या.
राज्यात अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण सरकारने ठेवले नाही. हि कृतीच मूळात असंवैधानिक आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे, अशी भीतीही वर्तविण्यात आली. आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. हि कृतीच मूळात असंवैधानिक आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे तत्त्व नाकारले आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे. कुणाचं तरी उखळ पांढरं करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे असा याचा अर्थ होतो. एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही,ही अतिशय गंभीर बाब आहे. हि या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे ?
युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाचा जी आर ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला असे विविध प्रश्न या आंदोलनातून उपस्थित केले गेले. आंदोलनात रिकाम्या खुर्च्यांवर कंत्राटी पंतप्रधान, कंत्राटी मुख्यमंत्री, कंत्राटी उपमुख्यमंत्री-१, कंत्राटी उपमुख्यमंत्री-२ आशा चिठ्या चिकटवू ठेऊन निदर्शने करण्यात आले. त्या वेळी या शासनाच्या जीआर ची होळी करण्यात आली व शासनाच्या विरोधात खालील घोषणा देण्यात आल्या.
सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .
यावेळी महिला अध्यक्ष मंगला पाटील, वाल्मीक पाटील, अशोक सोनवणे, मजहर पठाण, किरण राजपूत, हेमंत पाटील, मोहन पाटील, धनराज माळी, विश्वजीत पाटील, रहीम तडवी, रूपेश पाटील, विनायक चव्हाण, मनोज पाटील, समाधान निकम, नईम खाटीक, विनोद धमाले, हितेश जावळे, कुंदन सूर्यवंशी, योगेश साळी, पंकज तनपुरे, चेतन कोळी, योगेश पाटील, भैय्या पाटील, नाना पाटील, छोटू भाऊ, प्रमोद धवल पाटील, मोहसीन खाटिक, किशोर खोडपे, विक्रम शिंदे, भूषण पाटील, दिनेश भदाणे, वासुदेव सपकाळे, विजय चौधरी, विलास ननवरे, सौरभ पाटील, अब्दुल पटेल, संजय जाधव, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.