साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
सध्या आहार संतुलन बिघडल्यामुळे बरेच आजार निर्माण होत आहे. त्यासाठी चांगला पोषक आहार घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये तृण धान्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीराला योग्य जीवनसत्वे मिळतात आणि रोग प्रतिकारकशक्ती चांगली राहते. चांगले आरोग्य असेल तर बालकाच्या शारीरिक व बौद्धिक विकास चांगला होतो. त्यासाठी दररोजच्या जेवणातील आहार योग्य असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेता रोटवद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या सहकार्याने शालेय पोषण सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यात जवळपास १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
यासाठी परीक्षक म्हणून अ. चि.पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश पाटील आणि नांद्रा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जावळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी अंगणवाडीच्या कमलताई, संगीताताई, सुमित्राताई यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक विसपुते आणि त्यांच्या टीमने आयोजित केला होता. यावेळी विश्वास बावस्कर उपस्थित होते.