साईमत, चोपडा : प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाकडून अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन केले होते. यावेळी यावल प्रकल्पांतर्गत ६८१ शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार होती. त्यापैकी तब्बल ६८० शिक्षकांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत चाचणी परीक्षेकडे पाठ फिरविली. हा बहिष्कार शंभर टक्के यशस्वी झालेला असून शासनाच्या अन्यायविरुध्द कर्मचारी वर्गाने एकीचे बळ दाखवून दिले असल्याचे दिसून आले.
याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष भरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष विजय कचवे, राज्य सहकार्यवाह भूपेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पवार, तालुकाध्यक्ष विकास पाटील, हिवराळे, सत्रासेन संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले तसेच मुख्याध्यापक संदीप पाटील, जगदीश महाजन, भगवान भालेराव, दीपक पाटील, श्री.शिरसाट, श्री.वाघ, मधुकर भोई, निलेश धनगर, श्री.लांबोळे, गोपाल पाटील, विकास पाटील, सुनील कन्हैये, योगेश पाटील, उदय वानखेडे, विकास कोळी, नरेंद्र देसले, गजानन पाटील, विकास रामदास पाटील, विशाल भोई, हितेंद्र पाटील, श्री.जाधव यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.