Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»जळगाव जिल्हा ग.स.तर्फे ज्येष्ठ सभासद सन्मान निधीचा धनादेश वाटप
    चोपडा

    जळगाव जिल्हा ग.स.तर्फे ज्येष्ठ सभासद सन्मान निधीचा धनादेश वाटप

    saimat teamBy saimat teamDecember 14, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा ः प्रतिनिधी
    जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची नागरी पतपेढी जळगाव तसेच लोकसहकार गटातर्फे ज्येष्ठ सभासद सन्मान योजनेअंतर्गत संस्थेत चोपडा तालुक्यातील २५ वर्ष असणारे सभासद यांना ५००० रु.तथा ३० वर्ष असणारे सभासद यांना ७५०० रु.चा अशा ३४ सभासदांना धनादेश देत सत्कार पंचायत समितीमधील मिटींग हॉलमध्ये करण्यात आला.
    दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या संख्येने जिल्हाच्या ठिकाणी म्हणजे जळगावला होतो परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमाची सुरुवात चोपडा तालुक्यापासून करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन तथा लोकसहकार गटाचे नेते मनोज पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक तथा लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर,संचालक सुनिल निंबा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
    यावेळी प्रमुख पाहुणे विलास नेरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या ३ वर्षापासून लोकसहकार गटाची स्थापना करण्यात आली असून या गटातर्फे सभासद हिताचे असंख्य निर्णय घेण्यात आले असून यात प्रामुख्याने अपंग सभासद यांना संस्थेतर्फे १ लाख रु.कर्ज देण्यात येत असून ज्येष्ठ सभासद सन्मान निधी,ग. स.प्रबोधनी, सभासदांच्या मुलीच्या विवाहनिमित्ताने राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत प्रत्येकी ५००० रु.चा धनादेश,सावित्रीबाई फुले योजनेंंतर्गत सभासदाला एक मुलगी असेल तर १५ हजार रु. धनादेश तसेच दोन मुली असतील तर प्रत्येकी ७५०० रु.चा धनादेश चेक मुलीच्या १८ व्या वर्षापर्यत मुदतठेव पावती म्हणून ठेवण्यात येते.यावेळी सभासदांना लाभांश १० टक्के प्रमाणे देण्यात आले असून सभासद हित हेच आमच्या लोकसहकार गटाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    अध्यक्षणीय भाषणात अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले की,लोकसहकार गट संस्थेच्या व सभासदांच्या प्रगतीच्या दिशेने निर्णय घेत असून मयत सभासदांना त्यांच्या कर्जातून सूट,जनता अपघात विमा निधी १ लाखाहून ३ लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे.असे सर्व निर्णय सभासद हिताचे होत आहे.
    यावेळी संचालक सुनिल निंबा पाटील यांनी तर ज्येष्ठ सभासद यांच्यातर्फे विलास पाटील,प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
    यावेळी धरणगावचे अधिकारी संजय धनगर, पं.स.चे माजी उपसभापती एम.व्ही.पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल अमृत पाटील,संचालक श्यामकांत भदाणे,एन.एस.पाटील, ज्ञानेश्‍वर सोनवणे,कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्‍वास सुर्यवंशी,कर्ज नियंत्रण समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड पाटील,संस्थेचे सचिव एस.एम.पाटील,प्रशासकीय अधिकारी वाल्मिक पाटील,निंबा पाटील,अमर देशमुख,केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, नरेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे सतिष बोरसे उपस्थित होते.
    प्रास्ताविक माजी उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राधेश्याम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाधिकारी आनंद बोरसे,शिवाजी बाविस्कर, दिलीप सपकाळे,नारायण शिरसाठ, संजय पाटील, रविंद्र बोरसे यासह चोपडा शाखेतील कर्मचारीवृंदानी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.