साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
जळगाव येथील अल्पबचत भवनात जळगावच्या ‘राजनंदनी फाउंडेशन’ यांच्यावतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. त्यात विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे उपक्रमशील संगणक शिक्षक व्ही.डी.पाटील आणि विज्ञानचे उपक्रमशील शिक्षक संजय अमृत पाटील या दोघांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने मान्यवर सुरेश पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याबद्दल दोघा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील तसेच कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, आर्मी स्कूलचे प्राचार्य पी.एम.कोळी यांच्यासह सर्व शिक्षकांकडून, सर्व स्तरातून कौतुक होत आहे.