साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडी सीम(प्र.ज) येथील पोलीस पाटील समाधान पाटील यांचा गु्रप ग्रामपंचायत, जनसुराज्य ग्रामविकास मंडळ, राजमुद्रा अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार केला. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे मा. सभापती शाम अहिरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, भाजपचे अमळनेर उपतालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, खेडीच्या प्रथम नागरिक आशा पाटील, उपसरपंच शोभा पाटील उपस्थित होते. यावेळी सर्वं संस्थेचे पदाधिकारी, ग्रा.पं.चे सरपंच, सदस्य, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवरांच्या हस्ते पोलीस पाटील समाधान पाटील यांचा भव्य सत्कार करून गौरविण्यात आले.
समाधान पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पोलीस पाटीलच्या परीक्षेत शंभर पैकी ८८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच समाधान पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन सत्काराला उत्तर दिले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी यशवंतराव पाटील, किसनराव पाटील, बळवंत पाटील, विलास शिंदे, तानाजी पाटील, गुलाबराव पाटील, नागो चव्हाण, सुनील पाटील, राजेंद्र पवार, अनिल पवार, गोपाळ शिंदे, अनिल पाटील, विशाल वारुळे, भावेश पाटील, मयूर पाटील, स्वामी पाटील, सारंग पाटील, नरेंद्र पाटील, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, वाल्मीक पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किरण चव्हाण तर प्रा.जिजाबराव पाटील यांनी आभार मानले.