साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
सामाजिक संघटना अपंग जनता दलाची पत्रकार शेख अनिस यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत संजय गांधी निराधार योजना तसेच विशेष बीज भांडवलवरही चर्चा करण्यात आली. यावेळी पाच टक्के निधी, अंत्योदय योजना आदी विषयांचाही आढावा घेण्यात आला. अपंग जनता दलाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीला आनंद पाटील (राज्याध्यक्ष, नंदुरबार) भाऊसाहेब किसन दसपुते (राज्य संपर्कप्रमुख, जालना) जाकीर शेख (राज्य कार्याध्यक्ष, संभाजीनगर), कुसुम सुकासे (महिला राज्याध्यक्ष), रीना पाटील (महिला राज्य उपाध्यक्ष), कुणाल झाल्टे (राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय नाशिक), निलेश पाटील (जिल्हाध्यक्ष, जळगाव) देवेश दीपक पवार (जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव) विजय पवार (सचिव, जिल्हा जळगाव), प्रवीण सोनवणे (महासचिव, जि.जळगाव), दीपाली पाटील (महिलाध्यक्ष जि.जळगाव), सरला लुल्हे (उपाध्यक्ष, जि.जळगाव), हसीना तडवी (महिलाध्यक्ष ता.यावल), माधवी कवारे (महिला तालुकाध्यक्ष, चाळीसगाव), कल्पना लोहार (महिला तालुकाध्यक्ष, रावेर), ज्योती सोनवणे (महिला उपाध्यक्ष, ता.रावेर), शारदा महाजन (महिला सचिव ता.रावेर), नलिनी मोरे (महिला तालुकाध्यक्ष, चोपडा), मनीषा तायडे (महिलाध्यक्ष, ता.मुक्ताईनगर) यांच्यासह पदाधिकारी तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.