साईमत बोदवड प्रतिनिधी
आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड ते मुक्ताईनगर मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा मार्गे निघून काढण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घोषणा देत रॅली काढण्यात आली.
रॅलीत नगराध्यक्ष आनंदा पाटील, गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, दीपक माळी, नगरसेवक राजेश नानवानी, देवेंद्र खेवलकर, शाताराम कोळी, अमोल पाटील, निलेश माळी, दिनेश माळी, अमोल व्यवहारे, अजय पाटील, कलीम शेख, जितेंद्र पाटील, सरपंच नंदलाल पाटील, सोपान महाले, यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
