Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»छत्रपती संभाजी नगर»त्यांना सांगा, आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो
    छत्रपती संभाजी नगर

    त्यांना सांगा, आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलात नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 16, 2023Updated:September 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    सिंचन, शिक्षण, आरोग्य,वैद्यकीय सेवा- शिक्षण यासह मराठवाड्यातील सर्वांगिण विकासासाठी ५९ हजार हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही यात समावेश आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये शनिवारी कॅबिनेटची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे सात वर्षानी ही बैठक घेण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्हाला जे नावं ठेवत आहेत. त्यांना जरा सांगा की आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलत नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो आहोत. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक इथे आले होते, तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. पुढच्या वेळी त्यांना थोडा अभ्यास करायला सांगा असाही टोलाही शिंदेंनी विरोधकांना लगावला.
    शिंदे पुढे म्हणाले की, मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी आमची बैठक पार पडली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा बैठक झाली होती. राज्यातच नाही तर देशात एक मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकांनी घोषणा केल्या, आम्ही काम करत आहोत. आत्तापर्यंत आमच्या मंत्रिमंडळाने सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हणाले. वर्षभरात आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, त्यात सर्व सामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतले. आतापर्यंत शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
    आम्ही फक्त घोषणा करत नाही
    आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही. त्याची अमलबजावणी करतो. आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे. गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर १३ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील १४ हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे १३ हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण २७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chhatrapati Sambhajinagar:प्रचारादरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, शहरात तणाव

    January 7, 2026

    Ram Ghodke Appointed : कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्यपदी राम घोडके

    October 8, 2025

    artificial intelligence courses : शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा- अजित पवार

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.