पती,पत्नीस मारहाण करणाऱ्या दोघांना कांचन नगरातून अटक

0
43

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

शहरातील रचना कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून पती व पत्नीला धारदार वस्तून मारहाण करत जखमी करणाऱ्या सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी कांचन नगर परिसरातून ताब्यात घेतले.

याबाबत माहिती अशी की, गोपाल मधुकर चौधरी (वय-४८) रा. दत्त मंदिर जवळ, रचना कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बी.जे.मार्केट येथे लोटगाडीवर चिकन विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून शेंड्या उर्फ सुनील रसाळ राठोड, अनिल रसाळ राठोड दोन्ही रा. कांचन नगर, तांडव उर्फ विशाल पदमसिंह परदेशी रा. कुसुंबा ता.जि. जळगाव आणि एक अनोळखी असे चार जण येऊन कोयत्याने मारहाण करून गोपाल चौधरी याला दुखापत केली. तर त्यांच्या पत्नी यांना मारहाण करून घरातील सामानांची नासधुक करत दुचाकीचेही नुकसान केले. तसेच चौघांनी जीवेठार मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मारेकरी फरार झाले होते. एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी सुनील रसाल राठोड व विशाल पदमसिंह परदेशी यांना कांचन नगर परिसरातून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, छगन तायडे, सुधीर साळवे, इमरान सय्यद, ललित नारखेडे, किरण पाटील, सचिन पाटील यांनी केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here