साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘होवू द्या चर्चा’ हा कार्यक्रम जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात राबवायचा आहे. त्यासाठी दोन्ही मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय पदाधिकाऱ्यांसाठी नियोजन बैठका शनिवारी आणि रविवारी आयोजित केल्या आहेत. बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विजय परब तसेच विधानसभा संपर्कप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
विधानसभा मतदारसंघानिहाय बैठका (उबाठा) अशा राहतील. त्यात एरंडोल, पाचोरा, चाळीसगावसाठी शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी दु.३वा., पाचोरा येथील शिवसेना कार्यालय, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, चोपडासाठी रविवारी, १७ सप्टेंबर रोजी दु.१ वा. भुसावळ शासकीय विश्रामगृह, तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेरसाठी रविवारी, १७ सप्टेंबर रोजी दु.३ वा. जळगाव सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे केले आहे.
जिल्हा तसेच तालुका शिवसेना, अंगिकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ हर्षल माने, प्रा.समाधान महाजन, दीपक राजपूत यांनी केले आहे.