साईमत जळगाव प्रतिनिधी
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे १४ ते १९ वर्षातील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल (मुले – मुली) क्रीडा स्पर्धा 2023-24 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या.
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षातील संघाचा अंतिम सामन्यात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ संघाशी अगदी अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या काही क्षणात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ यांनी गोल केला. यात कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाचा संघ उपविजयी ठरला.
स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडु म्हणून आपल्या विद्यालयाच्या चि.रत्नदीप अरविंद सोनवणे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे या विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उपविजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे करण्यात आले.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय यादव, फुटबॉल संघाचे कोच उदय फालक, क्षितिज सोनवणे, जितेंद्र पाटील, सिद्धार्थ शिंदे, ललित लोहार यांचे मार्गदर्शन लाभले.