साईमत : जळगाव : प्रतिनिधी
येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या प्रांगणात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला की, आज दिवसभर हिंदी भाषा बोलायची. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर , उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम व हिंदी विभागातील संगीता पाटील , नीता पाटील , दिपाली झोपे, रोहिणी निकुंभ , वैशाली भदाणे , प्रज्ञा राणे , जेष्ठ मार्गदर्शक एस.डी.भिरूड उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी दिना निमित्य भाषण,गीत ,कविता,नृत्य,सामुहिक गीत सादर केले.शाळेतील विद्यार्थी यश जाधव याने हिंदी भाषेचे महत्व विषद केले. देवयानी पाटील हिने “कोशिश करने वालो की हार नही होती “ही कविता सादर करून सर्वांची मने जिंकली. पलक बाविस्कर, वर्षा सूर्यवंशी, उन्नती पाटील, प्राजक्ता पाटील ,”नीम का महत्व” हे गीत सादर केले. हर्षल शेळके याने देशभक्ती पर गीत सादर केले इयत्ता ८ व १० च्या विद्यार्थांनी हिंदी दिवस शुभेच्छा नृत्य सादर केले. शाळेतील शिक्षक किरण पाटील यांनी हिंदी दिना निमित्य शेर,शायरी याचे महत्व समजून सांगितले. शिक्षिका प्रज्ञा राणे यांनी “तेरे मिट्टी मे मिलजावा” हे गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन शाळेतील विद्यार्थिनी सृष्टि आभाणे हिने केले तर आभार प्रदर्शन साईनाथ चौधरी या विद्यार्थांनी केले. संगीत साथ राजू क्षीरसागरसर व त्यांच्या चमू ने केले. यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.