साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बिलाखेड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मारुती मंदिरात चिमुकल्यांनी घंटानाद केला. यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण देवून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने मराठा आरक्षणाचा लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याची मागणीसाठी तालुक्यातील बिलाखेड येथे मारुती मंदिरात चिमुकल्यांनी घंटानाद केला. आंदोलनात मधुकर (साई बाबा) पाटील, आप्पा हाडपे, समाधान जाधव, ईश्वर महाडिक, शैलेश गवारे, सुनील पाटील, रोहित निकुंभ, पवन निकुंभ, योगेश जाधव, ऋषीकेश निकुंभ, गौरव गवारे, जय गवारे, ओम गवारे, पवन गवारे यांनी सहभाग घेतला.