साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
‘आयुष्मान भव’ योजनेअंतर्गत राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी भारतीयांना आरोग्याच्या पंधरवड्यात अधिकाधिक सहभागी होऊन पाच लाखापर्यंतच्या सेवेचा लाभ घेण्याचा आवाहन केले आहे. जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत ‘आयुष्मान भव’ योजनेअंतर्गत आरोग्य मोफत तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांनी केले. चाळीसगाव येथील महात्मा फुले जन आरोग्य संकुलात ‘आयुष्मान भव’ योजनेअंतर्गत आरोग्य मेळावा आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा देशाच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. चाळीसगाव येथील महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा सेंटर व ग्रामीण रुग्णालयात योजनेच्या शुभारंभप्रसंगी नागरिक उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मोहिमेअंतर्गत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा.उन्मेश पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक जनतेजवळ जाऊन त्यांना त्याचा लाभ करून द्यावा, असेही सांगितले.
रुग्णांशी साधला संवाद
यावेळी संपदा पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थित रुग्णांशी संवाद साधला. याप्रसंगी वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैदेही पंडीत, विस्तार अधिकारी पी.एन.सोनवदे, आरोग्य सेविका अधीक्षक रंजना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दीपक ठाकरे, विकास सोनवणे, संदीप जाधव, सोनू राजपूत, जितू कुमावत तसेच आरोग्य सेवक, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद दवाखाना, आशा स्वयंसेविका, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.प्रशांत पाटील तर आभार डॉ. वैदेही पंडीत यांनी मानले.