साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील पंकज ग्लोबल स्कूलमध्ये कबड्डीचे सामने नुकतेच पार पडले. कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील ३८ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षे आतील मुलांचा संघ विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड केली आहे. या संघाने तालुक्यातीलच धानोरा येथील झि. तो. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संघास नमवून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
संघाला क्रीडा शिक्षक अशोक साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, संचालक मंडळ तसेच चोपडा तालुका क्रीडा समन्वयक रवींद्र आल्हाट, विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकांनी कौतुक केले.