साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील पालकांसाठी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बनवण्याची स्पर्धा दि.१२ सप्टेंबर मंगळवार रोजी घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये जवळ जवळ 70 पालकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सुरवातीला श्री गणेश व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रवीण सोनावणे, समंवयिका अनघा सागडे, व परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात पालकांनी अतिशय सुंदर व सुबक पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवल्या. या स्पर्धेसाठी शाळेचे ज्येष्ठ कला शिक्षक रवींद्र भोईटे , योगेश पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक प्रसाद जोशी, द्वितीय क्रमांक स्वप्निल नेवे, तृतीय क्रमांक विलास पालीवाल तसेच योगेश चौधरी, दीप्ती साळी, शुभांगी येवले, ज्येष्ठ नागरिकांमधून जया भट यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख रोहिणी बावस्कर होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका अनघा सागडे, कलाशिक्षक संतोष शिरसाळे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेला सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले