साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील ३१ वर्षांपासून सामाजिक जनजागृती च्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते यासाठी गणेश मंडळाला सन २०१६ साली बेटी बचाव देखाव्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या अनुशंघाने यावर्षी बँकेच्या वतीने श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये स्थापित केलेल्या ११ मारूतींच्या देखाव्याचे भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान,जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निलम जोशी तर उपाध्यक्षपदी मनीषा आवारे याची निवड करण्यात आली.
जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात या वर्षी सर्व महिला सदस्यांची कार्यकारणी व समित्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत मंडळाने धार्मिक सामाजिक सांकृतिक देखावे सादर केले असून त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. मागील वर्षी बँकेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांची शौर्यगाथा या देखाव्याचे भव्य सादरीकरण देखील करण्यात आले होते.
मंडळाची सल्लागार समिती सतीश मदाने, सी.ए. कृष्णा कामठे, सी.ए. अनिल राव, भरतदादा अमळकर, संजय बिर्ला, हरिषचंद्र यादव, डॉ. आरती हुजूरबाजार, जयंतीलाल सुराणा, सी.ए. सुभाष लोहार, डॉ.अतुल सरोदे, सी.ए. नितिन झवर, संध्या देशमुख, विवेक पाटील, संजय प्रभुदेसाई, ललीत चौधरी, डॉ.सुरेन्द्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, सपन झुनझुनवाला, डॉ.पराग देवरे, सुशील हासवाणी, पुंडलिक पाटील, रत्नाकर पाटील, संजय नागमोती, सुनील अग्रवाल, बापूसाहेब महाले, हेमंत चंदनकर, ओंकार पाटील, कपिल चौबे, नितिन चौधरी.
कार्यकारणी अध्यक्ष निलम जोशी, उपाध्यक्ष मनीषा आवारे, सचिव विनया कुलकर्णी, कोषाध्यक्ष शिल्पा जोशी, कार्याध्यक्ष प्राजक्ता सातपुते. कार्यकारणी सदस्य प्रियंका झोपे, स्वाती भावसार, कल्याणी काळे, दुर्गेशनंदिनी पाटील, प्रणिता कुलकर्णी, अपर्णा भालेराव, अर्चना कुलकर्णी, किर्ति गयावाले, स्मिता गुजराथी, पल्लवी चौधरी, हिमाली पाटील, शीतल गुप्ता, प्रणिता तंगे, कोमल गायकवाड, सुलोचना सोनवणे. तसेच केशवस्मृति सेवा संस्था समूहातील सर्व सदस्यांचा देखील यात सहभाग असणार आहे.
दि.१९ सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेश उत्सवात भाविकांनी उत्साहपूर्ण सहभाग द्यावा असे आवाहन जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.