साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा रेल्वे स्टेशनवर भुसावळच्या नूतन डी.आर.एम. श्रीमती इती पांडे आल्या होत्या. तेव्हा त्यांना पाचोरा प्रवासी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये पाचोरा रेल्वे स्टेशनवर सायंकाळी सहा वाजेनंतर मुंबईला जाण्यासाठी कोणतीही गाडी नाही. त्यातच कोरोना काळात रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी पाचोरा इथून गाडी नाही. त्यासाठी पाचोरा स्टेशनवर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी पूर्ववत वेळ सुरू करण्यात यावी, आधी विविध मागण्यांसाठी आग्रही भूमिका पांडे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, संयोजक व्ही.टी.जोशी, पप्पू राजपूत, सुनील शिंदे, नंदकुमार सोनार, माजी नगरसेवक भैय्या साळवे, शहबाज बागवान, मुज्जू शेख, अनिल येवले, अखिल भारती मराठा युवक महासंघाचे अध्यक्ष गणेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी डीआरएमएस ऑफिसचे अधिकारी पाचोरा स्टेशन मास्तर पाटील उपस्थित होते.