साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील गोंडखेल येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील पालक सभेत शालेय व्यवस्थापन समितीची नुकतीच निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी पराडे होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आरती विठ्ठल कोळी यांची तर उपाध्यक्षपदी शिला अनिल राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड मुख्याध्यापक तथा सचिव संजीव ठाकरे यांनी जाहीर केली.
कार्यकारिणीत सदस्यांमध्ये वैशाली बनकर, अजय सपकाळे, सुरेखा चोपडे, संतोष पराडे, अश्विनी कोळी, सुमन गायकवाड, प्रवीण कोळी, शरद कोळी, नयना कोळी, रणजीत कोळी, किर्ती बहाकर, अशोक कोळी यांची निवड झाली. यशस्वीतेसाठी शिक्षक राजाराम कोळी, आकोश कोळी, नामदेव पाटोळे, प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले.