फैजपूर फार्मसी कॉलेज कॉपीप्रकरण दडपण्याचा प्रयत्न

0
24

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

फैजपुर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील २६ विद्यार्थी कॉपी केस मध्ये पकडले गेले . या घटनेला बारा दिवस उलटले तरी विद्यापीठाने संबंधितांवर कारवाई केली नाही. विद्यापीठाच्या एका परीक्षा केंद्रावर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी केस घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

फैजपूर येथील तापी परिसर संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात २८ ऑगस्ट रोजी एफ वाय बी फॉर्म तसेच एफ वाय एम फॉर्म या वर्गाच्या प्रथम सेमिस्टर परीक्षेत विदयापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने एफ वाय बी फार्मचे २६ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी तर एफ वाय एम फॉर्म ४ विद्यार्थी कॉपी करताना रंगेहात पकडले. या सर्व विद्यार्थ्यांचे पेपर विद्यापीठाने नेमलेल्या धरणगाव येथील महाविद्यालयाच्या भरारी पथकाने आपल्या ताब्यात घेतले. मात्र या घटनेला दोन आठवडे उलटून गेले. संबंधित महाविद्यालय हे माजी मंत्री मधुकरराव चौधरी आणि सत्तारूढ आमदारांचे असल्याने विदयापीठाकडून कारवाईकडे डोळेझाक केली जात असल्याचे बोलले जात आहे. या कॉपी केस प्रकरणांमध्ये जे जे समाविष्ट आहे त्यांच्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here