साईमत जळगाव प्रतिनिधी
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव या शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पारधी येथील महागणपती या धार्मिक स्थळास भेट दिली तर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पद्मालय या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संत मुक्ताबाई मंदिर कोथळी, संत चांगदेव मंदिर चांगदेव तसेच हतनुर धरण या ठिकाणी सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संत परंपरा, भौगोलिक वारसा तसेच ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घडवून दिले. तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गांधी तीर्थ या जैन व्हॅली येथे असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे आयोजन करून महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
सहलींचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर सहलीसाठी सहल प्रमुख सूर्यकांत पाटील , स्वाती पाटील , कल्पना तायडे यांचे विशेष सहकार्य लाभले.