साईमत जळगाव प्रतिनिधी
एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा, येथे जन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र पाटील, वैशाली पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजीता साळुंखे यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कृष्ण राधे ची वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण पाळणा पूजन व श्रीकृष्ण राधेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजा करण्यात आली. तदनंतर शाळेचे कलाशिक्षक कुशराजे पवार यांनी त्यांच्या समूहासमवेत “मिठे रस से भरियोडी राधाराणी लागे” गाणे सादर केले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभाग तसेच प्राथमिक, माध्यमिक विभागाचे एकूण आठ समूहनृत्ये सादर केलीं. या मध्ये श्रीकृष्ण जन्म सोहळा, बालपण, तारुण्यपण, मैत्री, शेषनागवतार, रासलीला, तसेच महाभारत अशा वेगवेगळ्या विषयांवर नृत्य अविष्कार सादर करण्यात आली.
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. शाळेच्या शिक्षिका मयुरी चिरमाडे व विद्यार्थी आदित्य पाटील यानीं श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक प्रदीप वाघ यांनी केले तर, आभार प्रदर्शन शिक्षिका रत्ना माळी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, सुजीता साळुंखे, अन्वेषा माहेश्वरी, रत्ना माळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.