प्रगती शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

0
33

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचलित प्रगती बालवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळेत गुरुवारी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दोरी बांधून त्याला पताका, फुगे व फुलांची माळ, लावण्यात आली. मध्यभागी दहीहंडी सजवून लावण्यात आली. मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, संगीता गोहील, मनीषा पाटील यांच्या हस्ते दहीहंडीची पूजा करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात बाल गोपालांनी दहीहंडी फोडली. टाळ्या वाजवून व नाचत नाचत चिमुकल्यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी गोपाळकाल्याचा प्रसाद सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here