साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सावरला येथील देवश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक आर. एस. उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ शिक्षक विवेक घोंगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनी शाळेत शिकविण्याचा अनुभव घेऊन ज्ञानार्जन केले. तसेच एक दिवस शाळेचे प्रशासन सांभाळले. त्यात योगिता इंगळे, रेणुका पाटील, तनिषा सपकाळ, नेहा सुरळकर, श्रुतिका तायडे, वैभव कोळी, सुमित पाटील, पवन इंगळे, परमेश्वर कोळी, महेश कोळी, विश्वजित सुरवाडे, कृष्णा जाधव यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी उपशिक्षक संतोष भगत, आशिष पाटील, राजू बावस्कर, अजय जाधव, महेश राणे, पुंडलिक पाटील यांनी परिश्रम घेतले.