साईमत, मुंबई : प्रतिनिधी
ऑगस्टमधील मोठ्या मान्सून खंडानंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील अंदाजे १० दिवस पाऊसदिलासा मिळण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असल्याने राज्याला त्याचा फायदा होईल, असे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. या प्रणाली अंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकेल.