साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जालना येथील अंतरवाली सराटी येथील आंदोलककर्त्यांना झालेल्या लाठीचार्जच्या प्रकाराचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेने जाहीर निषेध करुन दोषी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांना नुकतेच देण्यात आले.
निवेदन देतेवेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, माजी तालुका प्रमुख धर्मा काळे, शहर महिला आघाडी प्रमुख कविता साळवे, अल्पसंख्यांक आघाडीचे शहरप्रमुख वसीम शेख रज्जाक, महेंद्र जैस्वाल, शैलेंद्र सातपुते, संजय ठाकरे, आबासाहेब पाटील, चंद्रकांत नागणे, संजय साळवे, किरण आढाव, राजन कुमावत, भुरण अण्णा, चेतन आढाव, सचिन ठाकरे, रामेश्वर चौधरी, गौतम जाधव, जगदीश महाजन, सुभाष राठोड, दिनेश राठोड, रॉकी धामणे, प्रशांत कुमावत, सुनील गायकवाड, मुबारक शाह, विजय महाले, दिलीप राठोड, ज्ञानेश्वर देवरे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.