साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील रांजणी येथील विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू व्यक्तीमत्व प्रवीण जाधव यांची आपल्या नोकरीची ९ वर्ष सेवा रांजणी येथे केली. अशा प्रदीर्घ सेवेच्या कालावधीत त्यांनी रांजणी जि.प.शाळेचा अंतर्बाह्य विकास करून नवनवीन उपक्रम राबविले. तसेच शैक्षणिक प्रगती साधून अनेक पिढ्यांचे सोने केले. त्यांच्या कार्याची दखल घेत समस्त ग्रामस्थांच्यावतीने त्यांना शिक्षकदिनी ‘उत्कृष्ट आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावर्षापासून पुढे प्रत्येक वर्षी शिक्षक दिनानिमित्त आपल्या उत्कृष्ट अध्यापनाच्या जोरावर आणि अभिनव उपक्रमांच्या आधारे शैक्षणिक प्रगती साधणाऱ्या एका शिक्षकाची निवड करून दरवर्षी एका शिक्षक बंधु-भगिनीचा गौरव करण्यात येईल, असे ग्रामस्थांच्यावतीने ठरविण्यात आले.
यावेळी प्रवीण जाधव, नामदेव मंगरूळे, सुभाष बिंदवाल यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष शितल बिजागरे यांनी सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार केला. प्रास्ताविक वासुदेव साखरे, सुत्रसंचालन जुगोल ढाकरे तर आभार गजानन सत्रे यांनी मानले.