साईमत, जळगाव ः प्रतिनिधी
मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांनी एक प्रकारे गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता फडणवीसांनी राजीनामा देण्याबाबत मागील घटनांमधून प्रेरणा घ्यावी असे सुचक विधान शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांची मंगळवारी जळगावात सभा होती. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. शरद पवार म्हणाले की, गोवारींवर लाठी हल्ला झाला नव्हता, तिथे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबईतील एका घटनेनंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीच्या या २ उदाहरणांतून फडणवीसानी प्रेरणा घेऊन राजीनामा देण्याबाबत विचार करावा.
जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या िंशदे सरकारने आज हात वर केले. लाठीमाराचे आदेश सरकारने दिलेच नव्हते असे सांगत या प्रकरणी पोलिसांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. मराठा समाजाचा संताप टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत लाठीमाराबद्दल मराठा समाजाची माफी मागितली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलक आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर भाजपकडून जुन्या प्रकरणांचा हवाला देण्याचे काम सुरू झाले आहे. गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ११३ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा कोणी राजीनामा दिला नव्हता असा युक्तीवाद फडणवीसांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी या आरोपांचा समाचार घेतला.
गरीब लोकांवर अन्याय
शरद पवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे. विशेष अधिव्ोशन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, एक देश एक निवडणुकीवर चर्चा, विशेष अधिव्ोशन हे सगळे प्रकार देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.