साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी भारतरत्न डॉ. सर्वप्पली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. सर्वप्पली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम, ज्येष्ठ कला शिक्षक एस.डी.भिरूड उपस्थित होते. आज शाळेत शिक्षकांच्या जागी विद्यार्थी शिक्षक झाले होते. त्यामुळे ८० विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली.
यावेळी भारतरत्न डॉ.सर्वप्पली राधाकृष्णन यांच्या कार्याबद्दल शाळेच्या शिक्षिका पल्लवी ठोके यांनी माहिती दिली. त्यात विद्यार्थीमधून मुख्याध्यापक रोहन पाटील, उपमुख्याध्यापिका नंदिनी अवचार, पर्यवेक्षिका म्हणून सिमरन बोरसे यांनी शाळेचा कार्यभाग सांभाळला. विद्यार्थानी आपले मनोगत व्यक्त करतांना शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत आपल्या विचारांना व्यक्त केले. मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक सृष्टी अभाणे, सुदर्शन सूर्यवंशी, रोशनी चौधरी, राजश्री खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले.
यांचे लाभले मार्गदर्शन
कार्यक्रमासाठी के.टी.चौधरी, के.पी.पाटील, एस.आर.बेहेडे, टी.टी.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन करुणा काळबैले, आभार प्रियांका मोरे हिने मानले.



