चाळीसगावातील भुयारी गटारींवर टाकले ढापे

0
44

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील नागद रस्त्यावरील अँग्लो उर्दू हायस्कूलजवळील नगरपालिका अंतर्गत बनविण्यात आलेल्या भुयारी गटार बनविल्यापासून त्यात मोटार सायकल स्वार तर कधी चार चाकी वाहने फसत होत्या. या गटारीमुळे येथून रहदारी करणारे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला होता. या समस्या संदर्भात दैनिक ‘साईमत’ला मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी गटारीवर ढापे टाकण्यात आले आहे. याबद्दल नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आदिल चाऊस यांनी ‘साईमत’सह प्रस्तुत प्रतिनिधीचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here