साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी शिवकॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील रस्त्यांसह इतर कामांना तात्काळ गती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेव चौक आणि अजिंठा चौकात याठिकाणी प्रस्तावित उड्डाणपुल मंजूर झालेले असतांना सुध्दा उड्डाण पुल होत नाही. यामुळे महामार्गावर निष्पाप नागरीकांचा अपघातात बळी जात आहे. याबाबत मनसेने वेळोवळी निदर्शने, आंदोलन, मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन, महापालिका प्रशासन, आमदार, खासदारांसह तिन मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरात जागर यात्रेला सुरूवात केली आहे. यात शिव कॉलनी ते अजिंठा चौफुली उड्डाण पुल तातडीने तयार करावेत, जळगाव शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करावी आणि पाळधी ते तरसोद वळण रस्ता झाला पाहिजे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. कार्यक्रमात यमराजाच्या वेषभूषेने नागरीकांचे लक्ष वेधले होते.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मुकुंदा रोटे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घुगे, विनोद शिंदे, महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, चेतन पवार, सतिश सैंदाने – ललित शर्मा, शहर सचिव महेंद्र सपकाळे, मुक्ताई नगर तालुका अध्यक्ष, मधुकार भोई, भगवान कोळी,जिल्हा समन्यवयक राजेंद्र निकम, विकास पाथरे, श्रीकृष्ण महेश माली, श्रीकृष्ण मंगळे, सुदाम राठोड, दुर्गेश पन्हाल, पटान सपकाळे, खुशाल ठाकूर, संदीप गांडोळे, अक्षम चौधरी, कुणार पाटील, दीपक राठोड, प्रकाश जोशी, किरण सपकाळे, प्रमोद रुले, किशोर खलसे, अविनाश पाटील, प्रशांत बाविस्कर उमेश कोला, राजू डोंगरे, हरिओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, उमेश आठरे व आजी-माजी पदाधिकारी, अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
