साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील एका भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
सविस्तर असे की, पाचोरा शहरातील एका भागात ९ वर्षीय अल्पवयीन चिमुकली आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मे २०२३ पासून ते आतापर्यंत परिसरात राहणारा संशयित आरोपी सतीश शेजवळ याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, हा प्रकार पीडित मुलीने घरच्यांना सांगितला. त्यानुसार पीडित मुलीसह घरच्यांनी तातडीने पाचोरा पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सतीश शेजवळ याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक योगेश गणगे करीत आहे.
