साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने हिवताप कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी, ५ सप्टेंबर २०२३ पासून न्याय मिळेपर्यंत लाक्षणिक साखळी उपोषण करून आपला रोष व्यक्त करणार आहेत. यासाठी राज्यातील हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने आंदोलनात सामिल होवून अन्यायाविरूद्ध एकजुटीची लढाई देण्याची ताकद दाखवावी, असे संघर्ष समितीने आवाहन केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील योजनेमध्ये गट-क चे अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य कर्मचारी व गट-ड चे क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचे जवळपास अशोक संकपाळ १२ हजार कर्मचारी आहेत. १९५२ पासूनच योजनेचे अस्तित्व स्वतंत्र आहे. उक्त संवर्गाचे (सांगली) सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले. यामध्ये १९८५, १९९२, १९९७ व ८ जुलै २००३ ला सुधारणा केल्या. त्यावेळेस पदोन्नती साखळीतील पदावरील (जळगाव) पदोन्नतीची संधी कायम ठेवूनच नवीन सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले.
सेवेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय
२९ सप्टेंबर २०२१ च्या अधिसूचनेमध्ये पदोन्नती साखळीतील निम्न व पदोन्नती पदाची शैक्षणिक पात्रतेमध्ये वाढ केली. त्यामुळे जुन्या सेवा प्रवेश नियमामधील शैक्षणिक पात्रतेनुसार काकासाहेब शेळके कार्यरत कर्मचाऱ्याजवळ अधिसुचनेमधील शैक्षणिक पात्रता नाही. त्यामुळे जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबलेली आहे. २९ सप्टेंबरची अधिसूचना सेवेतील कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक ठरत असल्याने संघटनेने २० ऑक्टोबर २०२१ रोजी यावर आक्षेप नोंदविला होता.
