साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर
येथील आर.टी.काबरेमध्ये सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत फायनलमध्ये सेंट मेरी शाळेचा पराभव करून भारती विद्या मंदिर शाळेची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेने कबड्डी, कुस्ती, क्रिकेट अशा क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. कुस्ती व कबड्डीतही शाळेने यश संपादन केले आहे.
शाळेच्या क्रिकेट टीमची जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकांनी टीमचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक डी.ए. पाटील, प्रवीण मराठे यांनी परिश्रम घेतले.
