चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्रात नारायण अग्रवाल यांचे योगदान प्रेरणादायी

0
11

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगावला मोठा शैक्षणिक वारसा आहे. थोर गणितीतज्ज्ञ भास्कराचार्यांच्या भूमीत याचा पाया सहकार व शिक्षण महर्षी कै. रामराव जिभाऊ पाटील यांनी घातला. पुढे हा वारसा काही शिक्षणप्रेमींनी आवर्जून जपला. त्यात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायण अग्रवाल हे अग्रभागी राहिले आहे. गेल्या ६० वर्षापासून एखाद्या व्रतस्थाप्रमाणे ते वयाच्या ८६ व्या वर्षीही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्मार्ट व ग्लोबल शिक्षणातही एक पाऊल पुढे आहे. त्यांचे योगदान चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरले आहे, असे गौरवोद्गार व्यक्त करुन संस्थेसाठी सर्वतोपरी मदतही करु, असे आश्वासन जळगाव लोकसभेचे खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी दिले. शनिवारी आ.बं. विद्यालयाच्या प्रांगणात नारायण अग्रवाल यांच्या आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी अद्ययावत गणित, संगणक व विज्ञान प्रयोगशाळा दालनांचे उद्घाटने मान्यवरांच्या हस्ते झाले.

नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरुन संस्थेच्या प्रत्येक विभागात प्रयोगशील उपक्रम राबविले जात आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत गणित, संगणक प्रयोगशाळा उभारल्याचे योगेश अग्रवाल यांनी सांगितले. प्रास्ताविकात ॲड. प्रदीप अहिरराव यांनी नारायण अग्रवाल यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा परिघ उलगडून दाखवितांना संस्थेसाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाचा आढावा मांडला.

६० मुलींना शालेय साहित्याचे किटचे वाटप

शिवनेरी प्रतिष्ठानच्यावतीने ६० मुलींना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक आणि विश्वस्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here