लाठीचार्जच्या निषेधार्थ कासोदा गाव बंद

0
23

साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर

जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ पूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्यावतीने ठिकठिकाणी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आली. त्याच्याच निषेधार्थ रविवारी, ३ सप्टेंबर रोजी कासोद्यातही सकाळी नऊ वाजता श्रीराम मंदिराजवळ रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनावेळी एरंडोल – भडगाव रोड अर्धा तास अडविण्यात आला. त्यात मराठा समाजाच्या बांधवांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत ‘आरक्षण आमच्या हक्काचे आहे आणि ते आम्हाला मिळालेच पाहिजे’ असे मत त्याठिकाणी मांडले. लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ कासोदा पोलीस स्टेशनच्या स.पो.नी. योगिता नारखेडे यांना निवेदन देण्यात आले.

घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास अजून मोठ्या संख्येने संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल व त्याच्या होणाऱ्या परिणामास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ गाव बंदची हाक मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली होती. त्याला गावातील लहान मोठे सर्व व्यापाऱ्यांनी गाव बंदला साथ देत आपली दुकान बंद ठेवली. बंदला ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यांची होती उपस्थिती

निवेदन देतेवेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. त्यात मा. विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र पाटील, शिवसेना उबाठा गटाच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख महानंदा पाटील, शिंदे गट शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदाम राक्षे, मराठा पाटील समाज सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, सागर पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नरेश ठाकरे, संदीप वाघ, उमेश पाटील, अमोल पवार, सोनू शेलार, नंदू खैरनार, अशोक पाटील, सुनील पाटील, बापू सोनवणे, भूषण शेलार, अंकुश पाटील, निरंजन पाटील, किरण ठाकरे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here