साईमत जळगाव प्रतीनिधी
रोजी एकलव्य क्रीडा संकुल येथे झालेल्या शैक्षणिक वर्ष 23-24 च्या शालेय स्केटिंग या क्रीडा प्रकारा मध्ये पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव येथील स्केटिंग खेळाडूंनी विविध प्रकारात घवघवीत यश संपादन केले.
शालेय विभागीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून त्यांना प्रशिक्षक जागृती काळे, अश्विनी निकम यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशासाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक (गृह) रामकृष्ण कुंभार , वेल्फेअर अधिकारी, कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विजयी खेळाडू
सक्षम बाउस्कर ,श्रवण महाले ,प्रणव नेरकर, लावण्या पुराणिक, अनुज पवार, दीपेश पाटील, तेजस्विनी सोनवणे, मानसी चौधरी, ललित जाधव, साहिल तडवी, दुर्वेश पाटील , तेजल सूर्यवंशी.
