साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स ॲड के.के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालय, चाळीसगाव येथे संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीफळ फोडून, कुदळ मारून नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या सदस्यांनी श्रीफळ फोडून कुदळ मारून भूमिपूजन केले. त्यानंतर भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर.सी. पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, ज्युनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन नाना कुमावत, संस्थेचे ज्येष्ठ संचालक कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन मु. रा. अमृतकार, बांधकाम समितीचे चेअरमन जितेंद्र वाणी, ज्येष्ठ संचालक ॲड.प्रदीप अहिरराव, संचालक योगेश अग्रवाल, भोजराज पुन्शी, अशोक वाणी, निलेश छोरिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, आर्किटेक प्रशांत देशमुख, प्रशांत पाटील, राकेश राखुंडे, बुंदेलखंडी, आप्पासाहेब उपासनी, एन. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे, उपप्राचार्य मगर, संस्थेच्या सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक, समाजातील विविध संस्था, प्रतिष्ठित नागरिक, संस्थेच्या सर्व विद्यालयाच्यावतीने नारायण अग्रवाल यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य डॉ. अजय काटे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर तर आभार उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे यांनी मानले.
