साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर नगरपंचायत समिती व जीनियस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमान ३१ ऑगस्ट रोजी मुले व १ सप्टेंबरला मुली अश्या २ दिवस होणाऱ्या स्पर्धेत वयोगट १४, १७ व १९ तालुकास्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती अवार्डी तथा क्रीडा अधिकारी किशोर पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद प्रतिमेचे पूजन करून तथा कबड्डी स्पर्धेची सुरुवात नाणेफेक करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक डॉ.नंदलाल पाटील, संचालक नितीन पाटील, मुख्याध्यापक रत्नाकर पाटील, डॉ.निलेश पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, स्पर्धा सचिव जी.सी.पाटील, प्रा. समीर घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश काशीद, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे संचालिका उज्ज्वला काशीद, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष शिल्पा पाटील, संचालक नितीन पाटील, संचालक पंढरी पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन विजयी, उपविजयी संघास गौरविण्यात आले. तथा प्रायोजक भाग्योदय कलेक्शन यांच्या सौजन्याने सर्व गटाला ट्रॉफी देण्यात आल्या. स्पर्धेत तालुक्यातून ७३ मुलांचा संघ तर ४५ मुलींचा संघांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून व्ही.एन.पाटील, डी.के.चौधरी, ए. व्ही.जाधव, नरेंद्र पाटील, प्रेम खोडपे, शाहिद शेख, गजानन कचरे, हरीभाऊ राऊत, सुनील मोझे, देवा पाटील, तुषार पाटील, अनिल गायकवाड, अनिल पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी जहीर खान, वसीम शेख, नंदू पाटील, मनोज पाटील, राहुल भारंबे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सविता अधिकार तर आभार उमेश निंबोळकर यांनी मानले.
कबड्डी संघाचा निकाल असा
निकालात १४ वर्ष मुले – विजयी-आचार्य गजाननराव गरुड विद्यालय शेंदुर्णी, उपविजयी -जनता हायस्कूल, नेरी, १४ वर्ष मुली – विजयी – र.सू.जैन विद्यालय, तोंडापूर, उपविजयी-क.द.नाईक विद्यालय, पाळधी, १७ वर्ष मुले- विजयी-नूतन माध्यमिक विद्यालय, कापूसवाडी, उपविजयी-इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेरपुरा, १७ वर्ष मुली- विजयी -अ.चि.पाटील विद्यालय, रोटवद, उपविजयी- र.सू.जैन विद्यालय, तोंडापूर,१९ वर्ष मुले- विजयी- इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेरपुरा, उपविजयी- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जामनेर, १९ वर्ष मुली- विजयी- न्यू इंग्लिश स्कूल, फत्तेपूर, उपविजयी- इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेरपुरा.
