साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात आमरण उपोषण दरम्यान सकल मराठा समाजावर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध म्हणून सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी शहरातील राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शनिवारी, २ सप्टेंबर रोजी जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावतीने उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना देण्यात आले.
मराठा समाजाच्या प्रतिनिधींवर शासनाने बळाचा वापर करून पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्याचा निषेध म्हणून सोमवारी, ४ रोजी शहारातील राजमाता जिजाऊ चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊ चौकात (नगर पालिका चौक) उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज जामनेर तालुका यांच्यावतीने केले आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शरद पाटील, दशरथ पाटील, अशोक पाटील, प्रदीप पाटील, भगवान शिंदे, राजेंद्र मराठे, विशाल पाटील, नरेंद्र धुमाळ, प्रवीण गावंडे, शरद मोरे, निलेश मराठे, सागर पाटील, संतोष सोनवणे, अमोल ठोंबरे, युवराज खंडारे, दिनेश भीवसन, अतुल सोनवणे, किरण जंजाळ, भगवान सोनवणे, सुनील पाटील, माधव चव्हाण, आकाश बंडे, प्रल्हाद सोनवणे, प्रदीप गायके, पंढरी पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
