साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज बांधव व महिला भगिनी शांततेच्या मार्गाने उपोषणास बसले होते. आंदोलनकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याच्या निषधार्थ चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी, २ सप्टेंबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
आंदोलनात गणेश पवार, अरुण पाटील, खुशाल बिडे, सुमित कापसे, कुणाल पाटील, भैय्यासाहेब पाटील, विवेक रणदिवे, दिनेश पाटील, प्रमोद पांडुरंग पाटील, शशिकांत साळुंखे, अनिल निकम, किशोर देशमुख, नंदकिशोर पाटील, किशोर पाटील, भरत नवले, सुधीर पाटील, अशोक भोसले, रघुनाथ जगताप, समाधान पाटील, तमाल देशमुख, डॉ. अजय पाटील, गोरख साळुंखे, प्रा.चंद्रकांत ठाकरे, विजय पाटील, पंकज पाटील, अनिल पाटील, मुकुंद पाटील, सुनील चव्हाण, खुशाल पाटील, सतीश पवार, नितीन पाटील, राजु पगार, चेतन देशमुख, अनिल निकम, सुहास पाटील, पंजाबराव देशमुख, मुकुंद पाटील, खुशाल मराठे, गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, प्रमोद वाघ, छोटु अहिरे, अनिल कोल्हे, भाऊसाहेब पाटील, प्रदीप मराठे, दीपक देशमुख, गोपाल पाटील, भरत नवले, मुकुंद पवार, विलास मराठे, विनोद जाधव यांच्यासह सकल मराठा बांधव सहभागी झाले होते.
