साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा शिवसेना नेत्या उबाठा वैशाली सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे व शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीचार्जची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी, असे न झाल्यास उबाठा शिवसेना पाचोरा रस्त्यावर उतरेल. त्यांच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी वरिष्ट नेते रमेश बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, शहर संघटक दत्ताभाऊ जड़े, शहर संघटक दादाभाऊ चौधरी, शहर प्रमुख भरत खंडेलवाल, युवा सेना तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, उपजिल्हा संघटिका तिलोत्तमा मौर्य, राजेंद्र भोसले, ॲड.अभय पाटील, प्रवीण पाटील, मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अनिता पाटील महिला आघाडी, जिभाऊ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पप्पू जाधव, हिलाल पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, युवराज धोबी, विलास पाटील, महेंद्र पाटील, प्रवीण शिंपी, धनराज पाटील, संतोष पाटील, मुनीर तडवी, शेख हाफिज, राहुल चौधरी, दीपक भोई, भारत पाटील, गौरव पाटील, साईनाथ राठोड, समाधान हटकर, भाऊसाहेब पाटील, तुळशीराम पाटील, निलेश गवळी, दादाभाऊ गवळी, संतोष कदम, दीपक मुळे, देविदास सावळे, विठ्ठल एरंडे, जिभाऊ पाटील, सागर पाटील, सुनील देवरे, नितीन लोहार, गोकुळ गांगुर्डे, अजय पाटील, नाना वाघ, संतोष सर, ॲड.किशोर पाटील, राजू गायकवाड, धर्मसिंग पाटील, डीडी नाना, शुभम पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.
