साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
जालन्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी पाचोरा येथे आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. जालना येथील मराठा बांधवावर झालेल्या अमानुष लाठीचार्ज तसेच घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, तसेच तात्काळ मराठा समाजबांधवांना आरक्षण मंजूर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.
निवेदन देतेवेळी युवा नेता सुमीत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी नगरसेवक शीतल सोमवंशी, बापू हटकर, प्रवीण ब्राह्मणे, दीपक पाटील, गजू पाटील, युवा सेनेचे संदीप पाटील, चंद्रकांत धनवडे, सुरज शिंदे, भावडू पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
