साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर
भुसावळ महावितरण कंपनीतर्फे ग्रामीणमधील किन्ही कक्षामधील मोतीराम नगर भागातील १८ ग्राहकांना तात्काळ २४ तासाच्या आत वीज मीटर कनेक्शन करुन दिले आहेत. तसेच अजून ३२ ग्राहकांनी नवीन वीज पुरवठा घेण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यांनाही २४ तासाच्या आत तात्काळ वीज पुरवठा देण्यात येईल, असे कळविण्यात आले. सर्व ग्राहकांना २४ तासाच्या आत वीज कनेक्शन मिळाल्यामुळे ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच उर्वरित ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, सहाय्यक अभियंता कविता सोनवणे, महावितरण कर्मचारी प्रकाश तायडे, गोकुळ पाटील, कैलास सुरवाडे यांच्यासह सर्व वीज ग्राहक उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच मोहंमद गवळी, मासूम गवळी यांनी सहकार्य केले.
