साईमत, चोपडा : प्रतिनिधी
भारतीय जैन संघटना आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात सकाळपासूनच कांताई नेत्रालयात तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती. यावेळी नेत्रालयाचे व्यवस्थापक युवराज देसर्डा, नेत्र चिकित्सक डॉ. जैतील शेख, गांधी रीचर्स फाउंडेशनचे सदस्य प्रशांत पाटील, रजिक शेख यांचा शाल व मोतीमाळा देऊन सत्कार केला. कांताई नेत्रालयतर्फे युवराज देसर्डा यांनी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा यांचा सत्कार केला.
शिबिरातून जवळपास दहा रुग्ण ऑपरेशन करण्यासाठी जळगाव रवाना झाले. कांताई नेत्रालयाने रुग्णांना जळगाव येण्या-जाण्याची सोय केली होती. यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे मयंक जैन, चेतन टाटिया, दिनेश लोढाया, विपुल छाजेड, राहुल राखेचा, दर्शन देसलोरा, लतिश जैन, क्षितिज चोरडिया आदींनी परिश्रम घेतले.



