आशिया चषक : भारत विरूध्द पाकमध्ये उद्या लढत

0
16

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा पराभव करत विजयी सुरुवात केली. आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात शनिवारी होत आहे. या सामन्याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघाचा सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉकबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. आशिया चषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. यंदा श्रीलंकेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने आतापर्यंत अटीतटीचे झाले आहेत. त्यामुळे यंदाही चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. १९८४ पासून २०२२ पर्यंत भारत आणि पाकिस्तान एकूण १६ व्ोळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये भारताने ९ व्ोळा बाजी मारली तर ६ व्ोळा पाकिस्तान िंजकला आहे. १९९७ सालचा एक सामना पावसामुळे अनिर्णीत देखील राहिला होता. त्यामुळे आतापर्यंतच्या सामन्यात भारताचंच पारडं जड राहिल्याचं दिसून येते. १९८४ साली म्हणजेत भारताने १९८३ विश्वचषक िंजकल्यावर एक वर्षाने भारत-पाकिस्तान आमने-सामने आले. हा सामना ५४ धावांच्या तगड्या फरकाने भारताने िंजकला होता.

१९८८ साली भारताने चार गडी राखून पाकिस्तानला मात दिली होती. १९९५ साली मात्र प्रथमच पाकिस्तानने भारताला मात देत ९७ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. १९९७ मध्ये पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला.२००० साली पुन्हा पाकिस्तानने ४४ धावांच्या फरकाने विजय मिळवला. २००४ पुन्हा पाकिस्तान ५९ धावांच्या फरकाने िंजकला अशारितीने १९९७ चा अनिर्णीत सामना वगळला तर सलग तीन व्ोळा पाकिस्तानचा संघ िंजकला.

२००८ मध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारताने सहा विकेट्‌‍सनी बाजी मारली. २०१०, २०१२ अशा दोन्ही वर्षी अनुक्रमे ३ आणि ६ विकेट्‌‍सच्या फरकाने भारतच िंजकला. २०१४ साली मात्र शाहीन आफ्रिदीच्या तुफान खेळीच्या जोरावर पाकिस्तान अवघ्या एका विकेटने सामना िंजकला. २०१६ साली ५ विकेटने भारत िंजकला. २०१८ मध्ये दोन व्ोळा भारत-पाकिस्तान आमने-सामने आले. याव्ोळी एकदा ८ तर एकदा ९ विकेट्‌‍सने भारताने विजय मिळवला. २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन व्ोळा सामना झाला. दोन्ही संघाने एक एक विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here