मलकापूर : प्रतिनिधी
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्यावतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, यासह मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अनु.जातीमध्ये वर्गवारी व्हावी, बार्टीच्या धर्तीवर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना व्हावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि राजेंद्र वानखेडे तथा विजय पारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, ३१ ऑगष्ट रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मलकापूरला उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांना धरणे आंदोलनस्थळी लेखी निवेदन देण्यात आले.
आंदोलनाला उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख तथा मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.साहेबराव मोरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु पाटील, ज्येष्ठ नेते सोपानराव शेलकर, माजी नगरसेवक राजेंद्र वाडेकर, सुहास चवरे, प्रमोद अवसोरमोल, संभाजी ब्रिगेडचे योगेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक चांभारे, ज्ञानदेव तायडे, ॲड.दिलीप बगाडे, फिरोज खान, सादीक शेख, जावेद खान, विश्व हिंदु परिषदेचे दिलीप पाटील, सामाजिक समरसता सहप्रमुख दीपक चवरे, ईश्वर दीक्षित, रमेश तांगडे, प्रमोद खचै, प्रशांत भारंबे, विकास देशमुख, निळकंठ वाकडे यांनी भेट दिली.
यांचा होता सहभाग
आंदोलनात मेजर शंकर आव्हाड, श्रीमती यमुनाबाई भालेराव, भास्कर आघाम, गणेश क्षीरसागर, किशोर सोनोने, सुनील बोरले, कृष्णा शिरगोळे, महादेव हिवाळे, जगदेव वाघमारे, समाधान चंदनशिव, दीपक सोनोने, कडु सोनोने, सुनील खरात, राजु सोनोने, श्रावण हिवाळे, रोशन चंदनशिव, देवराव सोनोने, गजानन सोनोने, कुलदीप सोनोने, निवृत्ती वाघमारे, सुभाष शेलार, श्रीकृष्ण आव्हाड, पांडुरंग सोनोने, अनिल भालेराव, विक्रम रणशिगे, प्रवीण अंभोरे, शाम जाधव, अक्षय चंदनशिव, अरविंद सोनोने, तुळशीदास चिंचोले, मारोती अढायके, अनिल भालेराव, अनिल खरात, अमर क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.