Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘श्री शिवाय नमोस्त्युभं’ च्या गजरात शिव महापुराण कथेला सुरुवात
    जळगाव

    ‘श्री शिवाय नमोस्त्युभं’ च्या गजरात शिव महापुराण कथेला सुरुवात

    SaimatBy SaimatAugust 31, 2023Updated:August 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव,

    शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ संस्थेच्या मैदानात पवित्र श्रावण मासानिमित्त भव्य संगीतमय शिव महापुराण कथेचे गुरुवारी दुपारी 2 वाजता ‘श्री शिवाय नमोस्त्युभं’च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. श्रीधाम वृंदावन येथून आलेले आंतरराष्ट्रीय कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्री यांच्या श्रीमुखातून आज कथेदरम्यान भारतीय उच्च संस्कृतीचे, शिवमहापुराणचे महत्त्व त्यांनी संगीतमय कथेत विषद केले. युट्युब व फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कथेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

    शिवमहापुराण कथास्थळी महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी यांच्या आगमनाप्रसंगी विशाल भोळे व जुही भोळे या दाम्पत्यांने शिवमहापुराणाची पोथी शिरावर घेत, हजारो भाविकांच्या पुष्पवृष्टीने श्रावण मासाच्या महिमेला सुरुवात झाली. तसेच कथेच्या सुरुवातीला संत श्री बृजभूषणजी शास्त्री यांनी कथामंच अर्थात व्यासपीठाची परिक्रमा करुन भाविकांना नमन करुन कथेला सुरुवात केली.

    पांझरापोळ संस्थेचे केले कौतुक
    कथेच्या पहिल्या दिवशी शिवमहापुराणाचा महिमा सांगताना, भारतीय संस्कृती ही आध्यात्मावर तसेच सर्वधर्म समभाव जपणारी असल्याचे अनेक दाखले त्यांनी दिले. पांझरापोळ संस्थेतील गोसेवेचेही विशेष कौतुक शास्त्रीजींनी केले.
    गोमातेच्या श्रीचरणी आयोजित शिवकथेत आणि कैलाशवासी काशीवासींच्या कथेत आपण सर्व सहभागी झालात हे आपले सर्वांचे सौभाग्य आहे. जा पर कृपा राम की होई.. ता पर कृपा सब होई.. हे विषद करताना संत शास्त्रीजींनी आपल्या विवेचनात स्पष्ट केले की, ज्याच्यावर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आहे. तोच या कथाप्रांगणात प्रवेश करू शकतो. हे फल युगानुयुगे केलेल्या कर्मानेच मिळते.

    अनेक लोकांकडे संपत्ती आणि वैभव आहे. पण अशा धार्मिक कार्यक्रमांची फळे भाग्यवंतानाच मिळतात. श्रावण महिन्यात आपण सर्वजण शिवकथा ऐकण्याचा लाभ घेत आहात ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. भगवान शिव म्हणतात, मी स्वत: चालत येतो, जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकता; तेव्हा मी हजार पावले पुढे येतो.
    पहिल्या दिवसाच्या कथा समापनाची आरती शिवमहापुराण समिती सदस्य आमदार राजूमामा भोळे, अशोक जाजू, अशोक राठी, देवेन अग्रवाल, रामदयाल सोनी, श्‍याम जोशी, संजय व्यास, मनीष झंवर, श्रीकांत शर्मा, राजू बांगर, उमेश मालविया या सर्वांनी सपत्निक केली.
    शुक्रवार रोजी भाविकांनी 1.15 ला आसनस्थ व्हावे
    कथेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार रोजी शिवमहापुराण कथेचे श्रवण करण्यासाठी भाविकांनी दुपारी 1.15 वाजता आसनस्थ व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026

    Comments are closed.

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.