साईमत, नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ७८ गुन्हे दाखल झाले. यात २५ पोस्को व विनयभंगाचे गुन्हे आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांची नोंद करण्याचे प्रमाण वाढत आहे.यातील गुन्हे आणि खटले अजामिनपात्र असल्याने समाजात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होणे काळाची गरज आहे. यामुळे विकृत व्यक्तींवर जरब बसेल.वाढत्या जागरूकतेमुळे अशा प्रकरणांची वाढ काळजीत टाकणारी आहे.
ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव, कायद्याबद्दल माहिती नसणे अथवा काही संघटनांकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याने प्रभावी असणारा कायदा कुठे तरी मोडीत निघाला का, हे पाहणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय, चावड्यांवर, विविध सेवाभावी मंडळे यात शिक्षक किंवा समुपदेशकाला लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक गुन्ह्याच्या कोणत्याही प्रकरणाची जाणीव झाल्यास, मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची त्वरित पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे.
मुलांना सुरक्षित, संरक्षणात्मक आणि सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरणात शिक्षण मिळविण्याचा समान अधिकार आहे. वैयक्तिक फायद्यासाठी लोकांना पोक्सो कायद्यांतर्गत खोट्या खटल्यांमध्ये अडकवले गेल्याचे अनेक घटनांमध्ये दिसून येते, यासाठी बेकायदेशीर तोतया संघटनाचे संस्थापक, राजकारणींची माहिती खात्रीलायक आहे का, हे पोलिसांनी तपासणे महत्त्वाचे आहे.